आयपीएलच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांची यादी तयार केली तर त्यात भुवनेश्वर कुमारंच नाव पहिल्या क्रमांकावर असेल.भुवी त्याच्या लहरी चेंडूंनी अनेक फलंदाजांसाठी अडचणीचा ठरला आहे. हैदराबादसाठी तो सातत्याने विकेट घेत आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये जेव्हा त्याच्या हातात चेंडू असतो तेव्हा तो फलंदाजांना विकेटवर टिकून राहणे कठीण करतो. हैदराबाद संघ आज पंजाब किंग्स विरुद्ध सामना खेळत आहे. भुवीने आपल्या परिचित शैलीत संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले आणि यासह त्याने एक विक्रम आपल्या नावार केला आहे.

भुवनेश्वर या सामन्यात पंजाबचे कर्णधार असलेल्या शिखर धवनला बाद केले आणि यासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भुववेश्वर आपपीएलच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. पॉवरप्लेमध्ये धवन त्याचा 53वा बळी ठरला.

भुवनेश्वर आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. पंजाबविरुद्धचा हा सामना भुवनेश्वरच्या आयपीएल कारकिर्दीतील 138 वा सामना आहे. त्याने आतापर्यंत 48 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. त्याच्या नावावर 174 विकेट्स आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत उमेश यादव 51 विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर धवल कुलकर्णी 44 विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्यासोबत इशांत शर्मा आहे.