
आशिया कप स्पर्धेचं 16 वं पर्व सुरु झालं आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत काही विक्रमांची नोंद होणार आहेत. तर काही विक्रम मोडीत निघणार आहे. आशिया कप स्पर्धेतील सर्वात मोठ्या पार्टनरशिपबाबत जाणून घेऊयात..

आशिया कप 2012 मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत या सामन्यात मोहम्मद हाफीज आणि नासिर जामशेद जोडीने चांगला दम काढला. दोघांनी 224 धावांची पार्टनरशिप केली होती. या जोडीपुढे भारतीय गोलंदाज पुरते हतबल दिसून आले. (Photo : Reuter)

पाकिस्तानच्या शोएब मलिक आणि युनिस खान या जोडीने विक्रमी पार्टनरशिप केली. 2004 साली कोलंबोत हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात या दोघांनी 223 धावा केल्या होत्या. (Photo : Twitter)

आशिया कप 2023 पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना पार पडला. मुल्तान येथे सुरु असलेल्या सामन्यात बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद या जोडीने 214 धावांची भागीदारी केली. बाबर आझमने 151 आणि इफ्तिखार अहमदने 109 धावांची केळी केली. (Photo- Twitter)

आशिया कप 2014 साली टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध सामना खेळला. या सामन्यात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 214 धावांची खेळी केली. (Photo- Twitter)

2018 आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी जबरदस्त कामगिरी केली. या दोघांनी मिळून 210 धावांची खेळी केली. (Photo : AP)