
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने दुबईत झालेल्या सामन्यात विजयासाठी मिळालेलं 265 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि अंतिम फेरीत धडक दिली. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचण्याची कामगिरी केली आहे. अर्थात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पोहचण्याची हॅटट्रिक केली. (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडियाने याआधी 2017 आणि 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. टीम इंडियाने 2013 साली धोनी आणि 2017 साली विराट कोहलीच्या नेतृत्वात अंतिम फेरीत धडक दिली होती.

महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 23 जून 2013 रोजी इंग्लंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. (Photo Credit : Bcci X Account)

तर त्यानंतर विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मात्र पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला उपविजेता म्हणून मायदेशी परतावं लागलं होतं. Icc X Account)

तर आता टीम इंडिया पुन्हा एकदा 7 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पोहचली आहे. त्यामुळे रोहितसेनेने मायदेशी चॅम्पियन्स ट्रॉफीसह परतावं, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांची असणार आहे. (Photo Credit : PTI)