BBL: डेव्हिड वॉर्नरने विराट कोहलीचा विक्रम मोडला, कसा काय ते जाणून घ्या

बिग बॅश लीग स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरने आक्रमक खेळी करत शतक ठोकलं. पण त्याचं शतक संघाच्या कामी आलं नाही. कारण सिडनी सिक्सर्सने हा सामना जिंकला. पण डेव्हिड वॉर्नरने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला.

| Updated on: Jan 16, 2026 | 10:24 PM
1 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून डेव्हिड वॉर्नर टी20 लीगमध्ये व्यस्त आहे. बीबीएल स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. सिडनी थंडरचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सिडनी सिक्सर्सविरुद्ध स्फोटक शतक झळकावले.

2 / 5
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात थंडरसाठी डेव्हिड वॉर्नरने प्रथम फलंदाजी करताना या पर्वातील दुसरे शतक झळकावले. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 65 चेंडूत नाबाद 110 धावा केल्या. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 4  षटकारांचा समावेश होता.

3 / 5
वॉर्नरच्या स्फोटक शतकामुळे सिडनी थंडरने 20 षटकात 6 गडी गमावून 189 धावा केल्या. या शतकासह वॉर्नरने टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे.

4 / 5
डेव्हिड वॉर्नरने त्याचे दहावे टी20 शतक झळकावून विराट कोहलीला मागे टाकले आहे. यासह वॉर्नरने सर्वाधिक टी20 शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.

5 / 5
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आता टी20 क्रिकेटमध्ये नऊ शतकांसह चौथ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल 22  शतकांसह या यादीत अव्वल स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम 11 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 कन्नडवरून)