
इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकने इंडियन प्रीमियर लीग 2025 अर्थात 18व्या पर्वातून माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची तयारी करण्यासाठी ब्रूकने यावर्षीच्या आयपीएलसाठी अनुपलब्ध राहण्याची घोषणा केली आहे.

हॅरी ब्रुकचा हा निर्णय त्याच्या अंगलट येणार आहे. कारण आयपीएलच्या नव्या नियमानुसार मेगा लिलावात निवडल्यानंतर खेळाडूने माघार घेतल्यास 2 वर्षांची बंदी घातली जाईल. (Photo - PTI)

आयपीएलने हा निर्णय स्पर्धेच्या तोंडावर माघार घेणाऱ्या खेळाडूंसाठी लागू केला होता. विदेशी खेळाडूंच्या अशा वर्तनाविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी बीसीसीआयने नवीन नियम लागू केला आहे. (Photo - PTI)

या वर्षीच्या आयपीएल मेगा लिलावात सहभागी झालेल्या हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने तब्बल 6.25 कोटी रुपयांना खरेदी केले. स्पर्धा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना ब्रूकने आयपीएलमधून माघार घेतली आहे. (Photo - PTI)

हॅरी ब्रुक आणखी दोन वर्षे आयपीएलमध्ये स्थान मिळणार नाही. नव्या नियमानुसार त्याला दोन वर्षे आयपीएल खेळता येणार नाही. त्यामुळे जर हॅरी ब्रूकला पुन्हा आयपीएल खेळायचे असेल तर त्याला 2028 पर्यंत वाट पाहावी लागेल. (Photo - PTI)