
वूमन्स टीम इंडियाने नोव्हेंबर 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकत इतिहास घडवला. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कपवर नाव कोरलं. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसीसी, बीसीसीआय, केंद्र आणि राज्य सरकारकडून बक्षिस देण्यात आलं. या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. (Photo Credit : PTI)

दिल्ली सरकारकडून टीम इंडियाची ओपनर बॅट्समन प्रतिका रावल हीच्यासाठी बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ती यांनी प्रतिका रावल हीला दीड कोटी रुपये बक्षिस रक्कम देणार असल्याचं जाहीर केलं आहे. (Photo Credit: X/Rekha Gupta)

प्रतिकाने वर्ल्ड कप विजयानंतर 7 डिसेंबरला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेतली. त्यानंतर रेखा गुप्ता यांनी सोशल मीडियावर प्रतिकासोबतचे फोटो पोस्ट केले. तसेच प्रतिकाला बक्षिस जाहीर केलं. "खेळातील प्रतिबद्धता आणि कामगिरीचा सन्मान करत दिल्ली सरकारकडून प्रतिका रावल यांना दीड कोटी रुपये देण्यात येणार आहे", असं या पोस्टमध्ये म्हटलंय. (Photo Credit: X/Rekha Gupta)

प्रतिका रावल या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारी दुसरी फलंदाज ठरली. प्रतिकाने या स्पर्धेतील 7 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 308 धावा केल्या. (Photo Credit: PTI)

प्रतिकाला उपांत्य फेरीआधी दुखापत झाली. त्यामुळे प्रतिकाला उर्वरित स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे प्रतिकाच्या जागी शफाली वर्मा हीला संधी देण्यात आली. मात्र त्यानंतरही प्रतिकाला वर्ल्ड कप विजयानंतर मेडल देण्यात आलं. (Photo Credit: PTI)