
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटीला पहिला डाव संपला असून भारताकडे 6 धावांची आघाडी आहे. भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. तर इंग्लंडचा डाव 465 धावांवर आटोपला. (Photo_BCCI Twitter)

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी मिळून 8 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने पाच, तर प्रसिद्ध कृष्णाने दोन गडी बाद केले. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. (Photo- PTI)

मोहम्मद सिराजला दोन विकेट मिळाल्या असल्या तरी इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर खोऱ्याने धावा काढल्या. मोहम्मद सिराजने 27 षटकात 122 धावा दिल्या. विकेट काढल्या पण धावांवर अंकुश लावता आला नाही. (Photo-Alex Davidson/Getty Images)

मोहम्मद सिराजने 27 षटकांमध्ये एकही निर्धाव षटक टाकलं नाही हे विशेष.. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही मोहम्मद सिराजची कामगिरी काही खास नव्हती. मोहम्मद सिराजने 37 कसोटीत आतापर्यंत 102 विकेट घेतल्या आहेत. (फोटो- Alex Davidson/Getty Images)

मोहम्मद सिराजच्या खराब गोलंदाजीमुळे एकट्या बुमराह दबाव वाढला होता. दुसरीकडे, प्रसिद्ध कृष्णाही तितका प्रभावी ठरला नाही. त्यानेही 20 षटकात 128 धावा दिल्या. (Photo- PTI)