
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील 5 वा आणि अखेरचा सामना हा 7 ते 11 मार्च रोजी धर्मशाला येथे पार पडणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे.

इंग्लंड विरुद्धच्या या पाचव्या कसोटीतून टीम इंडियाचा 23 वर्षांचा युवा फलंदाज हा पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. या फलंदाजाने भारतासाठी आधी टी 20 पदार्पण केलं आहे.

देवदत्त पडीक्कल याला इंग्लंड विरुद्ध पदार्पणाची संधी मिळू शकते. रजत पाटीदार याला डच्चू देऊन त्याच्या जागी देवदत्तचा समावेश केला जाणार आहे.

देवदत्तने टीम इंडियासाठी 2 टी 20 सामने खेळले आहेत. देवदत्तने श्रीलंका विरुद्ध 2021 मध्ये पदार्पण केलं होतं.

तर देवदत्तने आयपीएलमध्ये 55 सामने खेळले आहेत. देवदत्तच्या नावावर आयपीएलमध्ये 1521 धावा केल्या आहेत.

देवदत्तला पदार्पणाची संधी मिळाल्यास तो भारताकडून टेस्ट डेब्यू करणारा 314 वा भारतीय ठरले.

टीम इंडियाकडून याआधी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान आणि आकाश दीप या चौघांनी पदार्पण केलं आहे.