ऋषभ पंतचा सलग दुसऱ्या शतकानंतर गौतम गंभीरमुळे कोलांटउडी मारण्यास नकार?

Rishabh Pant Rejects Gavaskar Somersault Request : ऋषभ पंत याने इंग्लंड दौऱ्याची अप्रतिम सुरुवात केली. पंतने डोन्ही डावात शतक केलं. पंतने पहिल्या शतकानंतर खास सेलीब्रेशन केलं. मात्र दुसर्‍या डावात पंतने शतकानंतर तसं केलं नाही. यामागे हेड कोच गौतम गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे.

| Updated on: Jun 26, 2025 | 9:44 PM
1 / 5
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत याने लीड्समध्ये इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात दुर्मिळ रेकॉर्ड केला. पंत परदेशात दोन्ही डावात शतक करणारा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला. मात्र पंतने दुसऱ्या डावातील शतकानंतर कोलांटउडी मारुन ट्रेडमार्क सेलिब्रेशन करण्यास नकार दिला. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने पंतला तसं न करण्याचा सल्ला दिला. (Photo Credit : Pti)

2 / 5
ऋषभ पंतने पहिल्या डावात शतक केल्यानंतर कोलांटउडी मारुन सेलिब्रेशन केलं. मात्र पंतने दुसर्‍या डावात शतक करुनही  त्याच्या खास पद्धतीने सेलिब्रेशन केलं नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. (Photo Credit : Pti)

3 / 5
पंतने दुसऱ्या डावात शतक केल्यानंतर स्टेडियममध्ये भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर उपस्थित होते. तेव्हा गावसकरांनी पंतकडे शतकानंतर कोलांटउडी मारण्याची मागणी केली. मात्र पंतने इशाऱ्याने गावसकरांना तसं करण्यास नकार दिला. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतच्या या नकारामागे गंभीरचा सल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : Pti)

4 / 5
रिपोर्ट्सनुसार, पंतला दुसऱ्या डावात शतकानंतर कोलांटउडी मारण्यापासून गंभीरने रोखलं होतं. मात्र याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र पंतला असं करण्यापासून गंभीरशिवाय दुसरा कुणीच रोखू शकत नाही, असंही म्हटलं जात आहे. (Photo Credit : Pti)

5 / 5
रिपोर्ट्सनुसार, पंतला कोणतीही दुखापत होऊ नये, या काळजीपोटी गंभीरने त्याला तसं न करण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं जात आहे. पंतचं कोलांटउडी मारणं हे दुखापतीला निमंत्रण असल्याचं गंभीरला वाटतं. (Photo Credit : Pti)