
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार आणि फलंदाज शुबमन गिल याला मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. शुबमनला पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (Photo Credit : Shubman Gill X Account)

शुबमनने आतापर्यंत अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमधील 3 सामन्यांमध्ये 101 च्या सरासरीने 607 धावा केल्या आहेत. शुबमनची या मालिकेतील 269 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. शुबमनने या व्यतिरिक्त 2 शतकं केली आहेत. शुबमनने आणखी 25 धावा केल्यास त्याच्या एकूण 632 धावा होतील. (Photo Credit : Shubman Gill X Account)

शुबमन यासह इंग्लंडमध्ये आशियाई फलंदाज म्हणून कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. तसेच शुबमन यासह पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याला पछाडेल. युसूफने 2006 साली इंग्लंडमध्ये 631 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Shubman Gill X Account)

गिलकडे या व्यतिरिक्त आणखी 2 रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. गिलने 146 धावा केल्यास त्याच्या या मालिकेत एकूण 753 धावा होतील. शुबमन यासह भारत-इंग्लंड मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. शुबमन यासह इंग्लंडचा माजी फलंदाज ग्रॅहम गूच यांना मागे टाकेल. (Photo Credit : Shubman Gill X Account)

गिलने चौथ्या कसोटीत 107 धावा केल्यास यशस्वी जैस्वाल याला मागे टाकण्यात यशस्वी ठरेल. शुबमनने 107 धावा केल्यास तो इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक 713 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल. यशस्वीने 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध 712 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Bcci)

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 3 सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताचा चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. (Photo Credit : Bcci)