ENG vs ZIM : जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास, सचिन तेंडुलकर विक्रम संकटात

इंग्लंडचा जो रूटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 153 सामने खेळले आहेत. यात 279 डाव खेळले असून 22612 चेंडूंचा सामना करत एकूण 13006 धावा केल्या आहेत. यासह जो रूटने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक नवीन टप्पा ओलांडला आहे. नव्या विक्रमाला गवसणी घालताना सचिन तेंडुलकरचा विक्रमही संकटात येईल असं दिसत आहे.

| Updated on: May 24, 2025 | 6:26 PM
1 / 5
इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात एकमेव कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचं पारडं जड दिसत आहे. कारण इंग्लंडने पहिल्या डावात 565 धावा केल्या आणि झिम्बाब्वेचा डाव 265 धावांवर आटोपला. फॉलोऑनमध्ये झिम्बाब्वेने तीन गडी गमावल्या आहेत. पहिल्या डावात जो रूटने 34 धावांची खेळी केली. यासह त्याने कसोटीत 13 हजार धावा पूर्ण केल्या. (फोटो- पीटीआय)

2 / 5
जो रूटने रूटने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 13 हजार धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला आहे. जो रूट सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याचा फॉर्म असाच सुरु राहिला तर कसोटीत नवा विक्रमवीर ठरेल. (फोटो- पीटीआय)

3 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये जलद 13 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम यापूर्वी दक्षिण अफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर होता. त्याने 159 कसोटीत 13 हजार धावांचा पल्ला गाठला होता. पण आता हा विक्रम जो रूटने मोडीत काढला आहे. (फोटो- आयसीसी)

4 / 5
जो रूटने इंग्लंडसाठी 153 कसोटी सामन्यात 13 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. त्याने झिम्बाब्वे विरुद्ध 34 धावा केल्या आणि त्याच्या नावावर 13006 धावा झाल्या आहेत. कसोटी इतिहासातील सर्वात कमी सामन्यांमध्ये 13 हजार धावा करणारा फलंदाज म्हणून विश्वविक्रम केला आहे. (फोटो- पीटीआय)

5 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जो रूट पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने येत्या काही वर्षात 2915 धावा केल्या तर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. यासाठी त्याला 2915 धावांची गरज आहे. पण यासाठी जो रूटला सातत्यपूर्ण तीन वर्षे चांगल्या फॉर्मात खेळावं लागेल. (फोटो- टीव्ही 9 नेटवर्क )