
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार जो रुट गेल्या काही वर्षांत सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करतोय. रुटचा टीम इंडिया विरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा त्याच्या कारकीर्दीतील 155 वा सामना असणार आहे. रुटला या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

जो रुटने कसोटी कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रुटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजार 87 धावा केल्या आहेत. रुट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे. (Photo Credit : PTI)

जो रुटने लीड्समध्ये टीम इंडिया विरुद्ध दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतकी खेळी केली. रुटने महत्त्वाच्या क्षणी अर्धशतक करत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (Photo Credit : AFP)

जो रुट टीम इंडिया विरूद्धच्या दुसर्या टेस्टमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करु शकतो. रुटला त्यासाठी 1 कॅचची गरज आहे. रुटने टेस्टमध्ये आतापर्यंत एकूण 210 कॅचेस घेतल्या आहेत. तर सर्वाधिक 211 कॅच घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. (Photo Credit : Tv9 Gujarati)

ताज्या आकडेवारीनुसार, जो रुट याने टेस्टमध्ये सर्वाधिक 210 झेल घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टीम इंडियाचा माजी दिग्गज राहुल द्रविड याने 210 कॅचेस घेतल्या आहेत. रुटला द्रविडला मागे टाकण्यासाठी फक्त 1 कॅचची गरज आहे. (Photo Credit : Tv9 Gujarati)