टी20 क्रिकेटला नवा किंग मिळणार! जोस बटलर विक्रमापासून फक्त 24 धावा दूर
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर टी20 क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचण्याच्या वेशीवर आहे. या फॉर्मेटमध्ये महान खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावण्यापासून फक्त 24 धावा दूर आहे. कसं काय ते समजून घेऊयात

मँचेस्टर सुपर जायंट्सचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या द हंड्रेड लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहे. 31 जुलैला ट्रेंट रॉकेट्सविरुद्धच्या सामन्यात बटलरने दोन चौकार आणि चार षटकारांसह 37 चेंडूत 55 धावा ठोकल्या. (PHOTO CREDIT- GETTY)

जोस बटलरच्या या खेळीमुळे मँचेस्टर सुपर जायंट्सला 137 धावांपर्यंत मजल मारता आली. या अर्धशतकी खेळीनंतर जोस बटलर एका मोठ्या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या अगदी जवळ आहे.(PHOTO CREDIT- GETTY)

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डच्या नावावर आहे. हा विक्रम आता जोस बटलरच्या दृष्टीक्षेपात आहे. हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 24 धावांची गरज आहे. त्याने काही दिवसांपूर्वी ख्रिस गेलला मागे टाकून दुसरं स्थान पटकावलं होतं. (PHOTO CREDIT- GETTY)

जोस बटलरने आतापर्यंत 520 टी20 सामन्यातील 490 डावात 14780 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 147.06 च्या स्ट्राईक रेटने 105 अर्धशतकं आणि नऊ शतकं ठोकली आहेत. कायरन पोलार्डने 746 सामन्यात 14803 धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT- GETTY)

द हंड्रेड स्पर्धेच्या आगामी सामन्यात जोस बटलरने 24 धावा करताच त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल. टी20 फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरेल. (PHOTO CREDIT- GETTY)