ETPL: दिग्गज खेळाडूने टिम विकत घेतली आणि कर्णधारपदही ठेवलं, सनरायझर्सचा स्टारही सहमालक

युरोपमध्ये नवी टी20 लीग स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत सहा संघ भाग घेणार आहेत. यापैकी एक संघ भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने विकत घेतला आहे. तर एक संघ दक्षिण अफ्रिकेच्या तीन दिग्गज खेळाडूंनी एकत्रितपणे खरेदी केली आहे. त्यापैकी दोन खेळाडू या लीगमध्ये खेळणार आहेत.

| Updated on: Jul 01, 2026 | 8:00 PM
1 / 5
क्रिकेटच्या जगात आणखी एका टी20 लीग स्पर्धेची एन्ट्री झाली आहे. या स्पर्धेला लवकरच सुरूवात होणार आहे. या लीगचं नाव आहे युरोपियन टी20 प्रीमियर लीग.. यात एका संघाचा कर्णधार स्टार क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे त्यानेच संघ खरेदी केला आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसून फाफ डुप्लेसी आहे. (Photo: PTI)

2 / 5
स्कॉटलँड, आयर्लंड आणि नेदरलँड क्रिकेट बोर्डाने एकत्रितपणे या नव्या टी20 लीग स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यात दक्षिण अफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू फाफ डुप्लेसी नेदरलँडची फ्रेंचायझी रॉटरडम डॉकर्सचा सहमालक आहे. (Photo: PTI)

3 / 5
फाफ डुप्लेसीच नाही तर दक्षिण अफ्रिकन संघातील सहकारी आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनही सहमालक आहे. तसेच दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स याचीही भागीदारी आहे. (Photo: PTI)

4 / 5
लीगच्या ड्राफ्टचं आयोजन 2 जुलैला होणार आहे. यापूर्वीच सर्व संघांनी काही खेळाडूंसोबत थेट करार केला आहे. डुप्लेसी आपल्या संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. तर क्लासेन देखील खेळणार आहे. या शिवाय डोनोवन फरेरा आणि एनरिक नॉर्खिया हे देखील संघात असतील. (Photo: PTI)

5 / 5
भारताची माजी स्टार फिरकीपटू आर अश्विन याचीही या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. राहुल द्रविडचा संघ असलेल्या डब्लिन गार्डियन्सचा कर्णधार आणि मेंटॉर म्हणून त्याला साईन केलं आहे. तर न्यूझीलंडचा स्टार ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर एडिनबर्ग कॅसल रॉकर्स संघाकडून खेळतील. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us