
एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेचे उस्मानाबाद जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेचे उद्धाटन उपविभागीय अधिकारी मा.श्री. डॉ. योगेश खरमाटे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अर्जुन पुरस्कारार्थी सारीका काळे, उस्मानाबाद चे तहसिलदार श्री गणेश माळी, जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री अलिमोद्दीन काझी, उपाध्यक्ष श्री मुबारक सिद्दीकी, सचिव श्री जावेद शेख हे उपस्थित होते.

स्पर्धेबाबत प्रस्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले. सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने टीम सहभागी झाल्या आहेत.

सध्या राज्यात एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेची धूम आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात जिल्हा स्तरावर या स्पर्धा सुरु आहेत.

महाराष्ट्राच्या मातीतून उत्तम फुटबॉलपटू घडवणं हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एक विजेता संघ निवडला जाणार आहे.