हजारो कोटींची संपत्ती, महागड्या गाड्या, आलीशान बंगल्यात राहतो फेडरर

| Updated on: Sep 15, 2022 | 11:47 PM

फेडररची श्रीमंती पहाल तर थक्क व्हाल. जाणून घ्या...

1 / 6
टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं निवृत्तीची घोषणा केली आहे. संपूर्ण पिढीला टेनिसकडं आकर्षित करणाऱ्या फेडररनं वयाच्या 41 व्या वर्षी जवळपास 24 वर्षांची कारकीर्द संपवली. फेडरर जगातील सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी एक तर आहेच. पण, सर्वाधिक कमाई करणारा खेळाडूही आहे. जाणून घ्या त्याच्या  श्रीमंतीविषयी...

2 / 6
फेडररनं त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण 20 ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकून हा विक्रम केला. फेडररनं 8 वेळा विम्बल्डन, 6 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, 5 वेळा यूएस ओपन आणि 1 वेळा फ्रेंच ओपन जिंकले.

3 / 6
जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंमध्ये फेडररची गणना होते. फोर्ब्सनं २०२१ मध्ये जाहीर केलेल्या यादीत फेडरर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातव्या क्रमांकावर होता.

4 / 6
फेडररची एकूण कमाई 4372 कोटी रुपये आहे. त्यानं वेगवेगळ्या ग्रँडस्लॅम आणि स्पर्धांमध्ये जिंकून सुमारे 1037 कोटी रुपये कमावले.

5 / 6
स्वित्झर्लंडचा असल्यानं जगातील सर्वाधिक पगारी खेळाडूंपैकी एक आहे. फेडररकडे काही अतिशय आलिशान आणि सुंदर घरे आहेत. त्याचे दुबईत घर आहे. तर स्वित्झर्लंडमध्येही काही घरे आहेत. यातील सर्वोत्तम ग्लास पेंटहाऊस आहे. हे झुरिच तलावाजवळ आहे. सुमारे दीड एकरात बांधलेले हे घर बांधण्यासाठी 65 लाख पौंड खर्च आला.

6 / 6
फेडरर महागड्या वाहनांचा शौकीन आहे आणि त्याच्या गॅरेजमध्ये अशा उत्तम आलिशान कार आहेत. ऑटोबिझच्या रिपोर्टनुसार फेडररकडे 6 कार आहेत. यापैकी 5 कार मर्सिडीजच्या असून, स्पोर्ट्स कारपासून ते एसयूव्हीपर्यंत आहेत. याशिवाय त्याच्याकडे रेंज रोव्हर एसव्हीआर आहे.