
भारत बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आली आहे. यात अष्टपैलू रवींद्र जडेजा याला स्थान मिळालं आहे.

बांग्लादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजाला स्थान मिळेल यात काही शंका नाही. कारण रवींद्र जडेजा एकटा बांगलादेशच्या संघाला बॅकफूटवर ढकलण्याची ताकद ठेवतो.

रवींद्र जडेजा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत महारेकॉर्ड करू शकतो. रवींद्र जडेजाने 72 कसोटी सामन्यात 294 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे विकेटच्या त्रिशतकाजवळ आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने 6 विकेट घेताच इतिहास रचणार आहे. जडेजा कसोटी सामन्यात 300 विकेट पूर्ण करणार आहे. रवींद्र जडेजाने 72 कसोटी सामन्यात 3036 धावाही दिल्या आहेत.

रविंद्र जडेजाने 13 वेळा पाच विकेट घेण्याची किमया साधली आहे. तसेच दोन वेळा कसोटीत 10 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. भारतीय फिरकीपटूंच्या यादीत अनिल कुंबळे 619 विकेटसह पहिल्या, आर अश्विन 516 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.