
इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत कर्णधार शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने 269 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. SENA देशाविरुद्ध द्विशतकी खेळी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. (Photo-PTI)

सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. कारण वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू आहे. त्याने 2010 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. यात त्याने नाबाद 200 धावा केल्या होत्या. तर कसोटीत सचिनच्या नावावर 6 द्विशतक आहेत. यात सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद 248 आहे. (Photo-Rebecca Naden/PA Images via Getty Images)

वनडे आणि कसोटीत द्विशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वीरेंद्र सेहवागही आहे. त्याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक ठोकलं होतं. यावेळी त्याने 219 धावांची खेळी केली होती. कसोटीत त्याच्या नावावर दोन त्रिशतकं आहेत. तर कसोटीत द्विशतकी खेळी आहे. (Photo-Santosh Harhare/Hindustan Times via Getty Images)

रोहित शर्माही कसोटी आणि वनडेत द्विशतकी खेळी केली आहे. त्याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. त्याने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 धावा केल्या आहेत. तर कसोटीत दोन द्विशतकं आहेत. त्याने 2019 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 212 धावा केल्या होत्या. (Photo-Pankaj Nangia/Getty Images)

ख्रिस गेल वनडे आणि कसोटीत द्विशतकी खेळी करणारा एकमेव विदेशी खेळाडू आहे. त्याने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावांची खेळी केली होती. तर कसोटीत त्याच्या नावावर दोन त्रिशतकं आहेत. त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 317 आणि श्रीलंकेविरुद्ध 333 धावा केल्या आहेत. (Photo-Mark Nolan/Getty Images)

भारतीय कर्णधार शुबमन गिल या यादीत सहभागी झाला आहे. त्याने 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये 208 धावा केल्या होत्या. तसेच कमी वयात द्विशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला होता. आता इंग्लंडविरुद्ध एजबेस्टनमध्ये 269 धावांची खेळी करत इतिहास रचला. (Photo-Surjeet Yadav/MB Media/Getty Images)