टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूंच्या नावावर

T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत काही विक्रम मोडले आणि रचले जाणार आहेत. या स्पर्धेत सिक्सर किंग कोण ठरणार याची उत्सुकता आहे. चला जाणून घेऊया आतापर्यंत कोणत्या खेळाडूने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारले आहेत.

| Updated on: Feb 02, 2026 | 6:16 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा वर्षाव  होणार यात काही शंका नाही. भारतीय क्रीडाप्रेमींच्या अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा आहेत. तसेच सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याही या यादीत असणार आहेत. इतर संघाचे खेळाडूही या स्पर्धेत असणार आहेत. असं असातना आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत कोणते खेळाडू सिक्सर किंग ठरले आहेत ते जाणून घेऊयात.. (Photo- PTI)

2 / 5

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकारांचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 63 षटकार मारले आहेत. हा विश्वविक्रम असून त्याने 31 डावात 965 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. (Photo- PTI)

3 / 5

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने या स्पर्धेत एकूण 50 षटकार मारले आहेत. त्याने 44 डावात 1220 धावा केल्या आहेत. (Photo- PTI)

4 / 5

षटकारांच्या यादीत जोस बटलर तिसऱ्या स्थानावर आहे. विकेटकीपर फलंदाज जोस बटलरने 34 डावात 43 षटकार मारले आहे. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 42.2 च्या सरासरीने 1013 धावा केल्यात. त्याचा स्ट्राईक रेट हा 150 च्या जवळपास आहे. (Photo- PTI)

5 / 5

षटकारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आहे. त्याने 41 डावात 40 षटकार मारले आहेत. तर पाचव्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने 33 डावात 35 षटकार मारले आहेत. (Photo- PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us