दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत, अहमदाबाद किंवा लखनौच्या कर्णधार पदावर नजर

| Updated on: Oct 28, 2021 | 10:45 PM

आगामी आयपीएलमध्ये अर्थात IPL 2022 मध्ये 8 नव्हे तर 10 संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणाही करण्यात आली असून लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाली आहे. नव्या संघाच्या येण्याने अनेक बदल होणार हे नक्की.

1 / 4
IPL 2022 च्या मेगा ऑक्शन लवकरच पार पडणार आहे. यावेळी 8 च्या जागी 10 संघ असल्याने मोठ्या खेळाडूंच्या बाबतीत काही मोठे बदल होणार हे नक्की! सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई हार्दीक पंड्याला रिटेन न करण्याची शक्यता असताना आता दिल्लीचा धाकड खेळाडूही संघाची साथ सोडू शकतो.

2 / 4
हा खेळाडू म्हणजे दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer). आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचं 
कर्णधारपद ऋषभ पंतकडे गेलं आणि त्याने संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे श्रेयसकडे परत कर्णधारपद आलं नसल्याने आता त्याची नजर नव्याने आय़पीएलमध्ये येणाऱ्या लखनौ आणि अहमदाबाद संघाच्या कर्णधारपदावर असणार आहे.

हा खेळाडू म्हणजे दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer). आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे गेलं आणि त्याने संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे श्रेयसकडे परत कर्णधारपद आलं नसल्याने आता त्याची नजर नव्याने आय़पीएलमध्ये येणाऱ्या लखनौ आणि अहमदाबाद संघाच्या कर्णधारपदावर असणार आहे.

3 / 4
श्रेयस अय्यर हा कर्णधारपदावरुन दिल्ली संघाला अलविदा करु शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार श्रेयसला कर्णधाराची भूमिका निभवायची असून दिल्ली पंतकडून त्याला हे पद देईल ही शक्यता फार कमी असल्याने अय्यर संघ सोडू शकतो.

4 / 4
नव्याने समोर आलेल्या नियमांनुसार आधीपासून आयपीएलमध्ये खेळत असलेले 8 संघ हे त्यांचे 4 जुने खेळाडू रिटेन करु शकतात. अर्थात संघात कायम ठेवू शकतात. असे करुन उरलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी 3 खेळाडू हे नव्याने सामिल झालेले लखनौ आणि अहमदाबाद हे संघ आपल्या ताफ्यात घेऊ शकणार आहेत. यामध्येच अहमदाबाद किंवा लखनौ संघाला एक-एक कर्णधार लागणार असून श्रेयसचा विचारही केला जाऊ शकतो.