Faf Du Plessis : फाफ डु प्लेसीस गौतम गंभीरला खलनायक म्हणाला, कारण काय?

Faf Du Plessis on Gautam Gambhir: क्रिकेट वर्तुळात आणि चाहत्यांमध्ये टीम इंडियाचा हेड कोच आणि माजी फलंदाज गौतम गंभीर याच्याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. मात्र फाफ डु प्लेसीसला गंभीरबद्दल काय वाटतं? जाणून घ्या.

| Updated on: Mar 26, 2026 | 5:51 PM
1 / 5
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज गौतम गंभीर स्वभावाने बऱ्यापैकी गंभीर आहेत. कायम  गंभीर भावमुद्रा असणाऱ्या भारताच्या मुख्य प्रशिक्षकांना दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसीस याने व्हीलन असं म्हटलंय.  मात्र फाफने गंभीरला कौतुकाने व्हीलन म्हटलंय. "माझा गंभीरकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा त्या खेळाडूंपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे जे त्याच्यासोबत खेळले आहेत, असं फाफ जिओस्टारच्या आयपीएल टुडे हॉट टेक्समध्ये म्हणाला. त्याच्या विरुद्ध खेळताना कायम त्यालाच खलनायक मानलं जातं, असंही फाफने म्हटलं. (Photo Credit: PTI)

2 / 5
"फाफने गंभीरचं कौतुक केलं. तसेच फाफने गंभीर कट्टर प्रतिस्पर्धी असल्याचं म्हटलं. आपण कुणाला आवडतो की नाही याची गंभीरने कधीच पर्वा केली नाही", असं फाफने म्हटलं. "तुम्ही कर्णधार किंवा त्याच्या विरुद्ध खेळणारे खेळाडू असाल तर निश्चित तुमचा पराभूत करण्याचा प्रयत्न असेल, कारण विरोधी टीम म्हणून त्यांची खेळण्याची पद्धतच तशी आहे", असं फाफने म्हटलं. (Photo Credit: PTI)

3 / 5
"गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला एका मजबूत संघात बदललं", असं फाफने म्हटलं. तसेच गंभीर एक मापदंड निश्चित करतो. तसेच तुम्ही तुमच्या टार्गेटपासून भरकटलात, तर तो तुम्हाला धडा शिकवणार", असंही फाफने म्हटलं.  (Photo Credit: PTI)

4 / 5
आश्चर्याची बाब म्हणजे गंभीरबाबत इतकं काही बोललेला फाफ त्याच्यासोबत कधीच खेळला नाही. मात्र त्यानतंरही फाफ गंभीरला एक चिवट प्रतिस्पर्धी समजतो. तसेच फाफने गंभीरच्या विजयासाठी असलेल्या समर्पणाचं कौतुक केलं. (Photo Credit: PTI)

5 / 5
खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकेत गंभीरची निष्ठा ही विजयी संघ घडवण्यात अत्यंत महत्त्वाची राहिल्याचं फाफने म्हटलं. फाफनुसार, गंभीर स्तुती मागे धावत नाही. गंभीर स्तुतीऐवजी शिस्त आणि जबाबदारीवर अधिक लक्ष केंद्रीत करतो, असंही फाफने म्हटलंय. (Photo Credit: PTI)

Follow Us