GT vs SRH: साई सुदर्शनची अर्धशतकी खेळी, आयपीएल 2026 स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

आयपीएल 2026 स्पर्धेतील 56वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी करत एक विक्रम रचला आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

| Updated on: May 12, 2026 | 9:43 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत साई सुदर्शनची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. त्याने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत एक पल्ला गाठला आहे. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2026 स्पर्धेत साई सुदर्शनची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. त्याने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत एक पल्ला गाठला आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5

आयपीएल 2026 स्पर्धेत 500 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 12 डावात 501 धावा केल्या आहेत. साई सुदर्शनने मागच्या सहा डावात एक शतक आणि चार अर्धशतकं ठोकली आहेत. (Photo: IPL/BCCI)

3 / 5

साई सुदर्शनने मागच्या सहा डावात 100, 87, 6, 57, 55 आणि आता 61 धावांची खेळी केली आहे. या खेळीसह त्याच्या 500 धावा पूर्ण झाल्या आहेत. यावेळी त्याने वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि विराट कोहली यांना मागे टाकलं. (Photo: IPL/BCCI)

4 / 5

साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने गुजरात टायटन्सच्या डावात ऑरेंज कॅप डोक्यावर ठेवली. पण हैदराबादच्या डावात ती डोक्यावरून जाईल. कारण हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा या शर्यतीत आहेत. (Photo: IPL/BCCI)

5 / 5

साई सुदर्शनने 12 डावात 41.75 च्या सरासरीने 501 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राईक रेट हा 155.10 चा आहे. तर 100 ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्याने 49 चौकार आणि 22 षटकार मारले आहेत. (Photo: IPL/BCCI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us