IPL 2024 : गुजरात टायटन्सचा आयपीएल इतिहासातील सर्वात वाईट विक्रम, काय ते वाचा

| Updated on: Mar 27, 2024 | 6:49 PM

आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सने एन्ट्री घेतल्यापासून मोठी झेप घेतली आहे. 2022 च्या पहिल्या पर्वातच जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर 2023 आयपीएल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. अशी सर्व चांगली आकडेवारी असताना एक नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. चला जाणून घेऊयात काय ते

1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत गुजरात टायटन्स हा संघ शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सला पराभूत करत स्पर्धेला सुरुवात केली. पण चेन्नई सुपर किंग्सने दुसऱ्या सामन्यात खोडा घातला. गुजरातचा 63 धावांनी पराभव केला.

2 / 6
गुजरात टायटन्सचा या स्पर्धेतील हा पहिला पराभव ठरला. मात्र चेन्नई सुपर किंग्सने मोठ्या फरकाने पराभूत केल्याने गुणतालिकेत सर्वाधिक नुकसान झालं आहे. दोन गुण असूनही सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.

3 / 6
गुजरात टायटन्स फ्रेंचायसीचा आयपीएलमधील हे तिसरं पर्व आहे. पहिल्या पर्वात जेतेपद जिंकलं, दुसऱ्या पर्वात उपजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तिसऱ्या पर्वात सुरुवात चांगली झाली, पण चेन्नईने न भरून निघणारी जखम दिली आहे. 63 धावांनी झालेला पराभव हा आयपीएलमधील सर्वात मोठा पराभव आहे.

4 / 6
आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने गुजरातचा 23 धावांनी पराभव केला होता. लीगमधील हा गुजरातचा सर्वात मोठा पराभव होता. त्यानंतर आता गुजरातचा 63 धावांनी पराभव झाला आहे. इतक्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने नेट रनरेटही पडला आहे.

5 / 6
आयपीएल इतिहासात 2017 मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात मोठ्या फरकाने पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सने 212 धावांचं आव्हान दिलं होतं. पण दिल्लीचा डाव 66 धावांवर आटोपला आणि मुंबईने हा सामना 146 धावांनी जिंकला होता.

6 / 6
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज याआधी 2022 ते 2024 या कालावधीत आयपीएलच्या ग्रुप स्टेजमध्ये तीन वेळा आमनेसामने आले आहेत. प्रत्येक वेळी चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण ग्रुप स्टेजमध्ये पहिल्यांदाच चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला.