हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये नवा संघ मिळाला! कोणत्या फ्रेंचायझीकडून खेळणार? जाणून घ्या
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. फ्रेंचायझी आपल्याला आवश्यक असलेल्या खेळाडूंची ट्रेड विंडोच्या माध्यमातून देवाणघेवाण करत आहेत. असं असताना हार्दिक पांड्याच्या ट्रेडकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

आयपीएल 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या कोणत्या संघाकडून खेळणार? याची चर्चा रंगली आहे. असं असताना हार्दिक पांड्याबाबत एक बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. (PC-PTI)

मिडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघात नुसता सहभागी होणार नाही तर कर्णधारही होणार आहे. कारण कोलकात्यालाही एका कर्णधाराची गरज आहे. (PC-PTI)

कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व मागच्या पर्वात अजिंक्य राहणे याने केलं होतं. पण त्याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे हे पद रिक्त होतं. त्यासाठी आता केकेआर हार्दिक पांड्यावर डाव लावणार आहे. (PC-PTI)

हार्दिक पांड्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काय डील याचा काही खुलासा झालेला नाही. पण चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचे चाहते मात्र नाराज होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही संघ हार्दिक पांड्यासाठी उत्सुक होते. (PC-PTI)

हार्दिक पांड्याने आयपीएल स्पर्धेत 162 सामने खेळले असून 27हून अधिकच्या सरासरीने 2955 धावा केल्या. तसेच 82 विकेट घेतल्या. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल जेतेपद मिळवलं आहे. (PC-PTI)