
मॅन्चेस्टर यूनाइटेडचे हेड कोच रूबेन अमोरिम यांना मॅन्चेस्टर यूनाईटेड क्लबने काढून टाकलं ठआहे. या दिग्गज प्रशिक्षकाने जून 2027 पर्यंत करार केला होता. मात्र त्या आधीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दीड वर्षांची सेवा शिल्लक असताना त्यांना घरी बसवलं. मॅन्चेस्टर यूनाइटेडने लीड्सविरुद्ध 1-1 ड्रॉ खेळल्यानंतर हे पाऊल उचललं आहे. (Photo: Getty Images)

रूबेन अमोरिम यांना जवळपास तीन पट पैसे देत मॅन्चेस्टर यूनाइटेडसोबत काम जोडलं गेले. त्यांची पगार 6.5 मिलियन पौंड म्हणजेच 70-75 कोटी रुपये होती. पण हा करार पूर्ण होण्यापूर्वीच दीड वर्षाआधीच काढून टाकलं. आता त्यांना 18 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. (Photo: Getty Images)

मॅन्चेस्टर यूनाइटेड क्लबने रूबेन अमोरिमला उर्वरित पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. रुबेन अमोरिमला जवळपास 118 कोटी रुपये मिळणार आहे. कोच अमोरिम स्पोर्टिंग सीपीवरून मॅन्चेस्टर यूनाइटेडमध्ये आले होते. (Photo: Getty Images)

रुबेन अमोरिमने नोव्हेंबर 2024मध्ये मॅन्चेस्टर यूनाईटेडमध्ये रूजू झाला होता. क्लबकडे त्यांचा एक वर्षांचा करार वाढवण्याचा पर्याय होता. पण अमोरिम यांच्या कार्यकाळात काही चांगली कामगिरी नव्हती. त्यामुळे त्यांना पदावरून दूर केलं. (Photo: Getty Images)

मागच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा मॅन्चेस्टर यूनाइटेडच्या कोचने टीम इंडियाच्या प्रशिक्षकांची भेट घेतली होती. गौतम गंभीरने रूबेन अमोरिमसोबत फोटोही काढला होता. (Photo: PTI)