66 धावा आणि…! आयपीएल स्पर्धेत हेनरिक क्लासेन इतिहास रचणार, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं

आयपीएल 2026 स्पर्धेत हेनरिक क्लासेनने जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने अनेक विक्रम रचले आणि मोडले आहेत. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. आता एक मोठा विक्रम नावावर करण्याच्या वेशीवर आहे. काय ते जाणून घ्या..

| Updated on: May 13, 2026 | 7:27 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत हेनरिक क्लासेनने जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हेनरिक क्लासेन आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत 508 धावा केल्या असून एक मोठा विक्रम नावावर करण्याच्या वेशीवर उभा आहे. (PC-PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेत हेनरिक क्लासेनने जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हेनरिक क्लासेन आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत 508 धावा केल्या असून एक मोठा विक्रम नावावर करण्याच्या वेशीवर उभा आहे. (PC-PTI)

2 / 5

क्लासेनने आणखी 66 धावा केल्या तर आयपीएल इतिहासातील एका पर्वात नंबर 4 किंवा त्यापेक्षा खाली फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे. (PC-PTI)

3 / 5

ऋषभ पंतने 2018 या पर्वात नंबर 4 आणि त्या खाली फलंदाजी करताना 579 धावा केल्या होत्या. आता हेनरिक क्लासेनला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 66 धावांची गरज आहे. (PC-PTI)

4 / 5

हेनरिक क्लासेनने आतापर्यंत 12 सामन्यात 50पेक्षा जास्तीच्या सरासरीने 508 धावा केल्या आहेत. या खेळाडूच्या नावावर पाच अर्धशतकं आहेत. या खेळीत त्याने 23 षटकार आणि 38 चौकार मारले आहेत. (PC-PTI)

5 / 5

हेनरिक क्लासेन सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो आणि त्याला एका पर्वासाठी 25 कोटी रुपये मिळतात. आयपीएल 2025 स्पर्धेत त्याला रिटेन केलं होतं. त्याची खेळी पाहता सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी योग्य किंमत मोजली असं म्हणता येईल. (PC-PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us