ओव्हर नाही आता बॉलनुसार हिशोब, आयसीसीचा टी 20i बाबत मोठा निर्णय

Icc T20i Powerplay Rules : आयसीसीने क्रिकेटमध्ये 8 बदल केले आहेत. या बदललेल्या नियमांची अंमलबजावणी येत्या 2 जुलैपासून करण्यात येणार आहे. त्यानंतर आयसीसीने टी 20I क्रिकेटसाठीही एक बदल केला आहे. जाणून घ्या.

| Updated on: Jun 27, 2025 | 4:48 PM
1 / 5
टी 20i क्रिकेटचा थरार आणि रोमांच आणखी वाढवण्यासाठी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने मेन्स टी 20i क्रिकेटमधील पावरप्लेबाबत महत्त्वाचा बदल केला आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
आयसीसीने बदललेल्या नियमानुसार, टी 20I सामन्यात पावसामुळे काही षटकांचा खेळ कमी केल्यास आता ओव्हरऐवजी चेंडूंनुसार पावरप्ले निश्चित केला जाईल. (Photo Credit : PTI)

3 / 5
अनेकदा पावसामुळे टी 20I सामन्यात ओव्हर कमी केल्या जातात. परिणामी पावरप्लेमधील ओव्हर कमी केल्या जातात. मात्र आता तंस झाल्यास जितक्या ओव्हरचा खेळ होईल त्यानुसार पावरप्लेमध्ये किती षटक असणार, हे आयसीसीने निश्चित केलं आहे. नव्या नियमांनुसार, टी 20I सामन्यात पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ओव्हर कापल्या गेल्या तर पावरप्लमेधील ओव्हर कमी न करता बॉल कमी केले जातील.  (Photo Credit : PTI)

4 / 5
सामन्यातील एकूण 20 पैकी पहिल्या 6 ओव्हर पावरप्लेमधील असतात. मात्र आता नव्या नियमानुसार, 5 ओव्हरचा खेळ झाल्यास 1.3 ओव्हर पावरप्ले असेल. 10 ओव्हरचा सामना झाल्यास 18 बॉल पावरप्लेनुसार होतील. सामना 19.4 ओव्हरचा झाल्यास 5.4 ओव्हर पावरप्ले असेल. या नियमाची  अंमलबजावणी 2 जुलैपासून होणार आहे. टी 20 ब्लास्ट स्पर्धेत आधीपासूनच या नियमानुसार पावरप्लेच्या ओव्हर निश्चित केल्या जातात. (Photo Credit : PTI)

5 / 5
तसेच आयसीसीकडून टी 20I क्रिकेटमध्ये ओव्हर रेट कायम राखण्यासाठी स्टॉप क्लॉक नियम लागू करण्यात येणार आहे. ओव्हर संपल्यानंतर दुसरी ओव्हर सुरु करण्यासाठी 60 सेकंद अर्थात 1 मिनिटाचा वेळ मिळेल. संबंधित टीम 2 वेळा असं करण्यात अपयशी ठरल्यास त्यांना सूचित केलं जाईल. मात्र  तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास 5 धावांचा दंड ठोठावण्यात येईल.  (Photo Credit : PTI)