CT 2025 Semi Final : चॅम्पियन्स ट्रॉफी सेमी फायनलसाठी 4 संघ फिक्स, वनडे वर्ल्ड कपची पुनरावृत्ती

Icc Champions Trophy 2025 : 1 मार्च रोजी अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील चौथा संघ निश्चित झाला आहे. जाणून घ्या सर्वकाही.

| Updated on: Mar 01, 2025 | 6:43 PM
1 / 5
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील चौथा संघ अखेर निश्चित झाला आहे. दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचणारी चौथी टीम ठरली आहे. (Photo Credit : ProteasMenCSA X Account)

2 / 5
दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश करताच अफगाणिस्तानच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठया फरकाने विजय मिळवला असता तर अफगाणिस्तानला संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 179 धावावंर गुंडाळलं.  (Photo Credit : ACBofficials X Account)

3 / 5
ए ग्रुपमधून न्यूझीलंड आणि टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. तर बी ग्रूपमधून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. (Photo Credit : Icc X Account)

4 / 5
यासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतही टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत स्थान मिळवलं होतं.

5 / 5
दरम्यान 4 आणि 5 मार्च रोजी उपांत्य फेरीतील सामने होणार आहेत. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात A1 विरुद्ध B2 अशी लढत होणार आहे. तर दुसर्‍या सामन्यात B1 विरुद्ध A2 यांच्यात सामना होणार आहे.  (Photo Credit : ProteasMenCSA X Account)