
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. त्यामुळे टीम इंडिया या स्पर्धेतील सर्व सामने हे दुबईत खेळणार आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. तर 23 फेब्रुवारीला होणार्या इंडिया-पाकिस्तान महामुकाबल्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियात असे 3 खेळाडू आहेत, ज्यांच्यासमोर दिग्गज गोलंदाज गुडघे टेकतात. ते तिघे कोण आहेत? त्यांच्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. या तिघांमध्ये आजी माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली या दोघांचा समावेश आहे. तर तिसरा खेळाडू हा ऑलराउंडर हार्दिक पंड्या आहे.(Photo Credit : Bcci)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या स्थानी आहे. रोहित पाकिस्तानविरुद्ध विराटपेक्षा 3 सामने अधिक खेळला आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्ध 19 सामन्यांमध्ये 873 धावा केल्या आहेत. रोहितने पाकिस्तानविरुद्ध एका डावात सर्वाधिक 140 धावांची खेळी केली आहे. (Photo Credit : Bcci)

विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराट पाकिस्तानविरुद्ध 16 एकदिवसीय सामने खेळला आहे. विराटने या 16 सामन्यांमध्ये 678 धावा केल्या आहेत. विराटची पाकिस्तानविरुद्ध 183 धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo Credit : Bcci)

तिसऱ्या स्थानी ऑलराउंडर हार्दिक पंडया आहे. हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध एकूण 209 धावा केल्या आहेत. हार्दिकची पाकिस्तानविरुद्ध 87 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध 8 विकेट्सही घेतल्या आहेत. (Photo Credit : Bcci)