
न्यूझीलंड क्रिकेट टीमचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इतिहास घडवला आहे. केनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी हॅटट्रिक केली आहे. (Photo Credit : Icc X Account)

केनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये 94 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्ससह 102 रन्स केल्या. (Photo Credit : PTI)

केनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 15 वं तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं सलग तिसरं शतक ठरलं. केनने अशाप्रकारे शतकी हॅटट्रिक पूर्ण केली. (Photo Credit : PTI)

केनने याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी ट्राय सीरिजमध्ये 10 फेब्रुवारीला याच गद्दाफी स्टेडियम लाहोरमध्ये नाबाद शतक केलं होतं. केनने 113 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 133 धावा केल्या होत्या. (Photo Credit : BLACKCAPS X Account)

तर केनने त्याआधी बर्मिंघममध्ये 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केलं होतं. केनने तेव्हा नाबाद 106 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Icc X Account)

दरम्यान केनने आतापर्यंत एकदिवसीय कारकीर्दीत 15 शतकं झळकावली आहेत. केनने 172 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 हजार 225 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)