IND vs BAN : विराटचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात कारनामा, माजी कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी

Virat Kohli : विराट कोहली याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात इतिहास घडवला आहे. विराट यासह अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला सक्रीय खेळाडू ठरला आहे. विराटने माजी कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

| Updated on: Feb 20, 2025 | 8:01 PM
1 / 5
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात धमाका केला आहे. विराटने मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo Credit : Bcci)

2 / 5
विराट टीम इंडियाकडून सर्वाधिक कॅच घेणारा संयुक्तरित्या पहिला खेळाडू ठरलाय. विराटने माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्या विक्रमाची बरोबरी केली.

3 / 5
विराटने बांगलादेशविरुद्ध एकूण 2 कॅच घेतल्या आणि विक्रमाची बरोबरी साधली. विराटने बांगलादेशच्या नजमुल हुसैन शांतो आणि जाकेर अली या दोघांच्या कॅच घेतल्या. तसेच विराट यासह टीम इंडियासाठी सर्वाधिक कॅच घेणारा पहिला सक्रीय खेळाडू ठरला आहे. (Photo Credit : Bcci)

4 / 5
विराटच्या नावावर यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये 156 कॅचची नोंद झाली आहे. विराटने 298 व्या सामन्यात ही कामगिरी केली. तर अझहरुद्दीनला 156 कॅच घेण्यासाठी 334 सामने खेळावे लागले होते. विराटने एका सामन्यात सर्वाधिक 3 कॅच घेतल्या आहेत. (Photo Credit : Bcci)

5 / 5
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक कॅच घेण्याच्या यादीत विराटच्या पुढे 2 खेळाडू आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. तर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी  फलंदाज रिकी पॉन्टिंग आहे. पॉन्टिंगने 160 कॅच घेतल्या आहेत.