
अनुभवी आर अश्विन याची टीम इंडियात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी ऐनवेळेस निवड करण्यात आली. दुखापतग्रस्त अक्षर पटेल याच्या जागी अश्विनला टीममध्ये स्थान मिळालं.

आता अश्विन टीम इंडियाकडून वर्ल्ड कपमध्ये खेळणारा वयस्कर खेळाडू ठरणार आहे. अश्विनचा यासह टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या सर्वात वयस्कर 5 खेळाडूंमध्ये समावेश होणार आहे.

आर अश्विन 37 वर्षांचा आहे. अश्विनला वर्ल्ड कपसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळताच तो टीम इंडियाचा सर्वात पाचवा वयस्कर खेळाडू ठरेल.

सुनील गावसकर हे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी खेळणारे सर्वात वयस्कर खेळाडू आहेत. गावसकर वयाच्या 38 वर्ष 118 व्या दिवशी वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाले होते.

गावसकर यांच्यानंतर महेंद्रसिंह धोनी हा दुसरा वयस्कर खेळाडू ठरला. धोनीने वयाच्या 38 वर्षी वर्ल्ड कप खेळला होता. तर तिसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 37 व्या वर्षी वर्ल्ड कप खेळला. तर चौथ्या स्थानी फारुख इंजिनिअर आहेत.