IND vs AFG: 77 चेंडू आणि 100 धावा..! शुबमन गिलचा शतकी तडका आणि नोंदवले इतके सारे विक्रम

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलचा शतकी तडका पाहण्याची संधी भारतीय क्रीडाप्रेमींना मिळाली. शुबमन गिलने 77 चेंडू शतक ठोकत काही विक्रम आपल्या नावावर केले.

| Updated on: Jun 17, 2026 | 4:19 PM
1 / 5
India vs Afghanistan, 2nd ODI:  अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शुबमन गिलने शतक ठोकलं. पहिल्या वनडे सामन्यात त्याचं शतक काही धावांसाठी राहिलं होतं. त्याने 66 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने पुरेपूर संधीचा लाभ उचलला आणि शतक ठोकलं. (Photo: BCCI Twitter)

2 / 5
शुबमन गिलने 77 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार मारत शतक पूर्ण केलं. त्याने आपल्या वनडे क्रिकेट कारकि‍र्दीतलं नववं शतक ठोकलं. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुबमन गिलच्या शतकांची संख्या आता 21 झाली आहे. यासह त्याने मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरला मागे टाकलं आहे. (Photo: BCCI Twitter)

3 / 5
शुबमन गिलने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वात जलद वनडे शतक झळकावले आहे. भारतीय कर्णधार म्हणून सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 63 चेंडूंमध्ये शतक ठोकलं होतं. तर वीरेंद्र सेहवागने 69 चेंडूंमध्ये हा विक्रम केला होता. आता गिलने 77 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
शुबमन गिलने भारतात सर्वात कमी डावांमध्ये 1000 वनडे धावा करण्याचा विक्रमही मोडला. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी भारतात 24 डावांमध्ये 1000 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या होत्या. शुभमन गिलने हा पराक्रम केवळ 19 डावांमध्येच केला. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
अफगाणिस्तानविरुद्ध कमी चेंडूत शतक ठोकणारा शुबमन गिल पाचवा फलंदाज ठरला आहे. इओन मॉर्गेनने 2019 मध्ये 57 चेंडूत, रोहित शर्माने 2023 मध्ये 63 चेंडूत, इशान किशनने याच सामन्यात 71 चेंडूत, ग्लेन मॅक्सवेलने 2023 मध्ये 76 चेंडूत आणि शुबमन गिलने 77 चेंडूत शतक ठोकलं आहे. (Photo: BCCI Twitter)

Follow Us