4655 दिवसांची प्रतीक्षा संपली! हशमतुल्ला शाहिदीचं पहिलं वनडे शतक, क्रिकेट इतिहासातील चौथा फलंदाज ठरला
भारताने अफगाणिस्तानला तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने 219 धावांचं आव्हान टीम इंडियासमोर ठेवलं आहे. असं असताना कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीचं शतक खासं राहिलं. त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने सर्व गडी गमवून 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. यात अफगाणिस्तानच्या कर्णधाराने शतक ठोकलं. हे शतक विशेष ठरलं. (Photo: Afghanistan Cricket Twitter)

अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील दुसरं संथ शतक ठरलं आहे. यापूर्वी इब्राहिम झाद्रानने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 131 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. त्यानंतर हशमतुल्लाह शाहिदीचा नंबर लागतो. (Photo: Afghanistan Cricket Twitter)

अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने 13 वर्षांच्या वनडे कारकिर्दीत पहिलं शतक ठोकलं आहे. या शतकी खेळीत हशमतुल्लाहने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. या शतकासाठी त्याने 131 चेंडूंचा सामना केला. (Photo: Afghanistan Cricket Twitter)

हशमतुल्लाहने 2013 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर पहिल्या शतकासाठी त्याला 13 वर्षे वाट पाहावी लागली. पहिल्या शतकासाठी इतका काळ वाट पाहणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्यासाठी 4644 दिवस वाट पाहिली. (Photo: Afghanistan Cricket Twitter)

वनडे क्रिकेटमध्ये झिम्बाब्बेच्या रेजिस चकाबवाने 2008 ते 2022 या कालावधीत 5040 दिवस वाट पाहिली आणि शतक ठोकलं. त्यानंतर सुनील गावस्कर यांनी 4858 दिवस वाट पाहिली. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाने 4674 दिवस, तर अफगाणिस्तानच्या हशमतुल्लाहने 4644 दिवस वाट पाहिली. (Photo: Afghanistan Cricket Twitter)