IND vs AFG: रोहित शर्मा ठरला भारताचा सर्वात वयस्कर खेळाडू, 37 वर्षे जुना विक्रम अखेर मोडला
भारत आणि अफगाणिस्तान यांच्या वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत रोहित शर्मा प्लेइंग 11 चा भाग आहे. नाणेफेकीचा कौल होताच रोहित शर्माच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने 37 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. गेली 37 वर्षे हा विक्रम अबाधित होता. आता हा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केला आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात या विक्रमाची नोंद केली. (Photo: PTI)

पहिल्या वनडे सान्यात मैदानात उतरल्यानंतर रोहित शर्मा भारतासाठी सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने माजी महान अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांचा विक्रम मोडीत काढला. 37 वर्षांपूर्वी त्यांच्या नावावर हा विक्रम होता. आता हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. (Photo: PTI)

मोहिंदर अमरनाथ 39 वर्षे आणि 36 दिवसांचे असताना शेवटचा वनडे सामना खेळले होते. आता रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात उतरला तेव्हा त्याचं वय 39 वर्षे आणि 44 दिवस होते. त्यामुळे त्याच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. (Photo: PTI)

रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून होतं. अखेर त्याने आपलं फिटनेस दाखवून दिला आणि प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं. रोहित शर्माचा हा 283 वा वनडे सामना आहे. (Photo: PTI)

रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारी करत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या सामन्यात रोहित शर्मा फलंदाजीत काय करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. (Photo: PTI)