
पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारत मजबूत स्थितीत आला आहे. पहिल्या डावात टीम इंडियाने 150 धावापर्यंत मजल मारली. पण ऑस्ट्रेलियाने या धावांचा पाठलाग करताना 67 धावांवर 7 विकेट गमवल्या आहेत. पहिल्याच दिवशी एकूण 17 विकेट पडल्या. (Photo : BCCI Twitter)

भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियात 37 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 78 चेंडूंचा सामना केला आणि 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. यासह त्याने 47 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. (Photo : BCCI Twitter)

47 वर्षांपूर्वी इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज एलन नॉटने एका विक्रमाची नोंद केली होती. विदेशी विकेटकीपर म्हणून ऑस्ट्रेलियात 22 कसोटीत 33.84 च्या सरासरीने 643 धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश होता. (Photo : ICC Twitter)

पंतने नॉटचा हा विक्रम 8 कसोटीत आणि 13 डावात आपल्या नावावर केला. पंतने ऑस्ट्रेलियात 60.09 च्या सरासरीने 661 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. (Photo : BCCI Twitter)

पंत जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा भारताच्या 32 धावांवर 3 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर संघाच्या 73 धावा होईपर्यंत पंत एका बाजूने किल्ला लढवत होता. त्यानंतर त्याला नितीश रेड्डीची साथ मिळाली आणि 48 धावांच्या भागीदारीने धावसंख्या 100 पार पोहोचवली. (Photo : BCCI Twitter)