
टीम इंडियाने साखळी फेरीनंतर सेमी फायलनमध्येही विजयी घोडदौड कायम ठेवत 12 वर्षांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवला.

वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिेकेचा 16 नोव्हेंबर रोजी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

वर्ल्ड कप अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्पिनर वरचढ राहिले आहेत. टीम इंडियाचे कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा हे दोघे स्पिनर फुल्ल फॉर्ममध्ये आहेत. त्यात जडेजाचं हे होम ग्राउंड आहे. त्यामुळे स्पिन जोडीकडून टीम इंडिया चाहत्यांना अपेक्षा असणार आहेत.

नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता ही 1 लाखापेक्षा अधिक आहे. अंतिम सामना म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते उपस्थित असतील. त्यामुळे टीम इंडियाला होम कंडीशनचा फायदा होणार हे निश्चित आहे.