टीम इंडिया इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना जिंकणार का? हेडिंग्लेवर कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंतच्या शतकी खेळीनंतर टीम इंडियाने 370 धावांवर मजल मारली आहे. त्यामुळे इंग्लंड इतक्या धावा गाठणार का? हेडिंग्लेवर काय रेकॉर्ड ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 23, 2025 | 10:35 PM
1 / 5
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिला कसोटी सामना आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. भारताने दुसऱ्या डावात 364 धावा केल्या आहेत. तसेच विजयासाठी 370 धावा दिल्या आहेत. आता इंग्लंड या धावा गाठणार का? असा प्रश्न आहे.

2 / 5
भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 465 धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात 6 धावांची आघाडी होती. आता इंग्लंडचा संघ 350 पार धावा करणार का? यापूर्वी हेंडिग्लेवर कसा आहे रेकॉर्ड ते जाणून घ्या.

3 / 5
इंग्लंडने आपल्याच देशात सर्वाधिक 378 धावा गाठल्या आहेत. भारताविरुद्ध बर्मिंघममध्ये इतकी मोठी धावसंख्या गाठली आहे. 2022 मध्ये भारताविरुद्ध ही कामगिरी केली होती. मात्र लीड्सवर सर्वाधिक 359 धावांचा पल्ला गाठला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली आहे.

4 / 5
इंग्लंडने लीड्सवर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 359, 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 315 आणि 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 296 धावांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध हा चमत्कार घडेल का असा प्रश्न आहे.

5 / 5
पहिल्या डावात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह प्रभावी ठरला होता. या व्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णाने 3 आमि मोहम्मद सिराजने 2 विकेट काढल्या होत्या. पण प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजने सर्वाधिक धावा दिल्या होत्या. (फोटो- England Cricket Twitter)