
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेची सुरुवात टीम इंडियासाठी निराशाजनक राहिली. पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे भारतावर मालिकेत कमबॅकचं आव्हान आहे. दुसरा कसोटी सामना गमावला तर मालिका पूर्णपणे इंग्लंडच्या पारड्यात झुकेल.

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंघममध्ये सुरु होणार आहे. या सामन्यात शुबमन गिलकडे इतिहास रचण्याची संधी आहे. आतापर्यंत इतर भारतीय कर्णधारांना जे जमलं नाही ते करण्याची संधी आहे.

भारतीय संघाने बर्मिंघममध्ये आतापर्यंत 8 कसोटी सामने खेळले आहे. त्यात एकदाही विजयाची चव चाखता आली नाही. भारताने 8 पैकी 7 कसोटी सामने गमावले आहेत. तर एक सामना ड्रा झाला आहे.

भारताने पहिला कसोटी सामना 1967 साली खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकही कर्णधार या मैदानात कसोटी सामना जिंकू शकलेला नाही. पण शुबमन गिलकडे हा सामना जिंकण्याची संधी आहे.

बर्मिंघममध्ये कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजित वाडेकर, एस. वेंकटराघवन, मन्सूर अली खान पतौडी, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे कर्णधार होते. या सर्वांना अपयश आलं आहे. आता शुबमन गिलच्या नेतृत्वात काही सकारात्मक घडतं का? याकडे लक्ष असेल. (सर्व फोटो- बीसीसीआय)