IND vs ENG: वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळणं वेगळं वाटलं! इंग्लंडच्या जेकब बेथेल असं का म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi-Jacob Bethell: इंग्लंडच्या जेकब बेथेलच्या विधानाची क्रीडाविश्वात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याने वैभव सूर्यवंशीबाबत आश्चर्यकारक विधान केलं आहे. वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळणं विचित्र वाटलं, असं विधान केलं. नेमकं असं का म्हणाला?

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. असं असताना इंग्लंडच्या जेकब बेथेलने त्याच्याबाबत केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्याने वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळणं वेगळं वाटल्याचं सांगितलं आहे. (Photo: PTI)

वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळताना अवघडल्यासारखं वाटल्याचं जेकब बेथेल म्हणाला. कारण वैभव सूर्यवंशी त्याच्यापेक्षा सात वर्षे लहान आहे. वैभव सूर्यवंशी आता 15 वर्षांचा आहे, तर जेकब बेथेल 22 वर्षांचा आहे. (Photo: PTI)

जेकब बेथेलने वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीच्या गुणांची स्तुतीही केली. जेकब बेथेलने दुसरा टी20 सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वैभवबाबत भाष्य केलं. (Photo: PTI)

जेकब बेथेलने सांगितलं की, वैभव सूर्यवंशीला भारतात खेळताना पाहिलं आहे. आता त्याला येथेही खेळताना पाहात आहे. त्याची बॅट स्विंग जबरदस्त आहे. त्याच्यात कमालीचं टॅलेंट आहे. (Photo: PTI)

वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 10 चेंडूत 14 धावा केल्या. पण या सामन्यात भारताचा पराभव झाला. इंग्लंडने भारताला 4 गडी राखून पराभूत केलं. यात जेकब बेथेलने नाबाद 76 धावांची खेळी केली. (Photo: PTI)