ऋषभ पंतने एमएस धोनीचा विक्रम मोडला, विकेटकीपर म्हणून मोठा रेकॉर्ड नावावर

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या ऋषभ पंतची बॅट चांगलीच तळपली. आक्रमक फलंदाजी करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकलं आहे.

| Updated on: Jun 21, 2025 | 4:42 PM
1 / 6
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने शतकी खेळी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कर्णधार शुबमन गिल आणि ऋषभ पंतने चौथ्या विकेटसाठी 150हून अधिक धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे.

2 / 6
ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमधील सातवं शतक ठोकलं आहे. ऋषभ पंतचं इंग्लंडविरुद्धचं हे तिसरं शतक आहे. यापूर्वी एक शतक 2018 मध्ये, तर दुसऱं शतक 2022 मध्ये मारलं होतं.

3 / 6
ऋषभ पंतने शतकी खेळी करत कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. पंतने 76 डावात ही कामगिरी केली.

4 / 6
ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा झटपट पूर्ण करणारा दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या एडम गिलख्रिस्टने 63 डावात तीन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर पंतने 76 डावात ही कामगिरी केली.

5 / 6
दुसरीकडे, ऋषभ पंत SENA (दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशात सर्वाधिक धावा करणारा आशियाई विकेटकीपर ठरला आहे. ऋषभ पंतने यासह टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे.

6 / 6
ऋषभ पंतने सेना देशांमध्ये 27 सामन्यात 38.80 च्या सरासरीने 1746 धावा केल्या आहेत. यात चार शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीने 32 सामन्यात 1731 धावा केल्या आहेत.  (सर्व फोटो- बीसीसीआय ट्विटर)