
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 11 जानेवारीपासून सुरू होत आहे. टीम इंडिया या मालिकेने वर्षाची सुरुवात करत आहे. सर्वांच्या नजरा टीम इंडियाचे दोन माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर असतील. (Photo- BCCI Twitter)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग दोन शतके झळकावणारा विराट कोहलीकडून अपेक्षा जास्त आहेत. कारण कोहलीचा सध्याचा फॉर्म आहे. गेल्या पाच डावांमध्ये कोहलीने 3 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. (Photo- BCCI Twitter)

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही हाच फॉर्म कायम राहिला तर विराट कोहली विक्रम रचू शकतो. किवींविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक केले तर तो त्याच्या खात्यात आणखी एक विक्रम जोडेल. किवींविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके करणाऱ्यांच्या यादीत कोहली अव्वल स्थानावर असेल. (Photo- BCCI Twitter)

कोहलीने या तीन सामन्यांच्या मालिकेत फक्त एक शतक झळकावले तर तो माजी भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियन रिकी पॉन्टिंगला मागे टाकून न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारा नंबर वन खेळाडू बनेल. (Photo- BCCI Twitter)

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम विराट कोहली, रिकी पॉन्टिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. या तिघांनी प्रत्येकी सहा वेळा हा पराक्रम केला आहे. जर कोहलीने शतक केले तर तो केवळ सेहवागचा विक्रम नाही तर रिकी पॉन्टिंगला मागे टाकून जगातील नंबर 1 फलंदाज बनेल. (Photo- BCCI Twitter)