AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने आणि चांदीबद्दल चीनची अत्यंत मोठी घोषणा, एका रात्रीत बदलला थेट निर्णय, भारतीय…

सोने आणि चांदीच्या भावात मागील काही दिवसांपासून सतत अस्थिरता बघायला मिळत आहे. त्यामध्येच सोन्याचे भाव प्रचंड वाढली. आता नुकताच सोने आणि चांदीच्या नियमात अत्यंत मोठा बदल करण्यात आला.

सोने आणि चांदीबद्दल चीनची अत्यंत मोठी घोषणा, एका रात्रीत बदलला थेट निर्णय, भारतीय...
Gold and silver
| Updated on: Feb 25, 2026 | 2:06 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. दीड लाखांच्या पुढे सोने काही दिवसांपूर्वीच गेले होते. लाखभरापुढे सोन्याचे भाव आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याचे भाव अस्थिर आहेत. आता लग्नीनसराई असतानाही सोन्याचे भाव काही कमी होत नाहीत. त्यामध्येच आता सोने आणि चांदीच्या व्यापारातील गुंतवणुकीदारांसाठी मोठी बातमी आहे. शांघाय गोल्ड एक्सचेंजने सोने-चांदीच्या करारांमध्ये मार्जिन आणि दैनिक किंमत मर्यादा कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला. सोने आणि चांदीच्या नियमात एका रात्रीत मोठा निर्णय घेण्यात आला. एक्सचेंजने पुष्टी केली की त्यांनी सोने आणि चांदीच्या करारांचे नियमन करणारे काही नियम शिथिल केले आहेत. यामागील कारण म्हणजे व्यापार क्रियाकलापांना चालना देणे, बाजारातील रोख प्रवाह वाढवणे आणि त्याचबरोबर किंमतींच्या जलद हालचालींवर नियंत्रण ठेवणे आहे.

आंतरराष्ट्रीय सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये सतत अस्थिरता दिसून आली. तज्ञांचे म्हणणे आहे की, या अस्थिरतेला एक उपाय म्हणून एक्सचेंजने संतुलित दृष्टिकोन स्वीकारला आहे. शांघाय गोल्ड एक्सचेंजच्या सूचनेनुसार, सोने चांदीच्या करारांसाठी मार्जिन आणि किंमत हालचाली मर्यादा कमी करण्यात आल्या आहेत. सोने करारांसाठी मार्जिनची आवश्यकता 21 टक्क्याहून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर व्यापाऱ्यांना पूर्वीपेक्षा कमी रक्कम आता जमा करावी लागणार आहे.

सोन्याच्या किंमतीतील चढउतारांचा दैनंदिन पट्टा 20 टक्क्याहून 17 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.  विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, या सवलतींमुळे चांदीचा व्यापार अधिक होऊ शकतो. लहान आणि मध्यम आकाराच्या गुंतवणूकदारांसाठी ज्यांना आता सहभाग अधिक सुलभ वाटू शकतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर मार्जिन कमी केल्याने ट्रेडिंग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सुरूवातीचे भांडवल कमी होते. ज्यामुळे व्यवहारांच्या प्रमाणात वाढ होते आणि व्यवहार वाढतात. ज्यामुळे गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करणे सोपे होते. एका रात्रीत हे बदल करण्यात आली आहेत. आता या परिणाम नक्की काय होतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...