IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका नुसती गमावली नाही, तीन नकोसे विक्रमही केले नावावर

भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने गमावली. या कसोटी पराभवामुळे टीम इंडियावर नामुष्की ओढावली आहे. इतकंच काय तर तीन नकोसे विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत...

Updated on: Nov 26, 2025 | 6:17 PM
1 / 6
भारताने पुन्हा एकदा देशात कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझीलंडनंतर दक्षिण अफ्रिकेने भारताला भारतातच क्लिन स्विप दिला आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला दुसऱ्या कसोटी सामन्यात 408 धावांनी पराभूत केलं. तसेच मालिका 2-0 ने जिंकली. (Photo- BCCI Twitter)

2 / 6
पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 30 धावांनी पराभूत केल्यानंतर दुसरी कसोटी वाचवण्याचं आव्हान होतं. पण टीम इंडियाने दोन्ही डावात नांगी टाकली. पहिल्या डावात 201 धावा आणि दुसऱ्या डावात 140 धावांवर खेळ आटोपला. (Photo- BCCI Twitter)

3 / 6
भारतीय संघाचा घरच्या मैदानावर सर्वात लाजिरवाणा कसोटी पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीमध्ये 408 धावांनी पराभूत केलं. यापूर्वी 2004 मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 342 धावांनी पराभव झाला होता. 2006 मध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा 341 धावांनी पराभूत केलं होतं. (Photo- BCCI Twitter)

4 / 6
मागच्या 20 वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाचा एकही फलंदाज संपूर्ण कसोटी मालिकेत शतक झळकावू शकला नाही. यापूर्वी अशी घटना 1995 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत घडली होती. या मालिकेत भारतीय फलंदाजांनी वाईट कामगिरी केली होती. (Photo- BCCI Twitter)

5 / 6
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कसोटी मालिका विजय मिळवला. यापूर्वी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 492 धावांनी पराभूत केलं होतं. (Photo- BCCI Twitter)

6 / 6
दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. दक्षिण आफ्रिकेने 2000 मध्ये भारतीय भूमीवर शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. आता 25 वर्षानंतर पुन्हा इतिहास घडवला आहे.  (Photo- South Africa Twitter)