
विराट कोहली आज 100 वा कसोटी सामना खेळत आहे. मॅचच्याआधी विराटला बीसीसीआयने सन्मानित केलं.

राहुल द्रविड यांनी विराटला बीसीसीआयच्यावतीने एक खास कॅप भेट दिली. त्यावेळी पत्नी अनुष्का शर्माही विराट सोबत होती.

सोशल मीडियावर विरुष्काच्या समर्थकांनी दोघांचं भरपूर कौतुकही केलं. त्यांना किंग आणि क्वीन म्हटलं आहे.

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 70 शतकं झळकावली आहेत. यात 43 शतकं वनडेमध्ये तर 27 शतकं कसोटीमध्ये झळकावली आहेत.

विराटने यावेळी बीसीसीआयचे आभार मानताना कुटुंबियांसाठीही अभिमानाचा क्षण असल्याचं सांगितलं.

आभार प्रदर्शन झाल्यानंतर विराटने पत्नी अनुष्का शर्माची मैदानातच गळाभेट घेतली. दोघांचे हे खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.