
21 वर्षीय दुनिथ वेल्लालेगने भारताविरुद्ध अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. त्याच्या खेळीमुळे श्रीलंकेला चांगली धावसंख्या फलकावर झळकावता आली. श्रीलंकेने 50 षटकात 8 गडी गमवून 230 धावा केल्या आणि विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं.

दुनिथ वेल्लालेगने 59 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. संघाची स्थिती नाजूक असताना त्याची ही खेळी महत्त्वाची ठरली. सहाव्या क्रमांकावर येऊन त्याने संघाचा डाव सावरला.

दुनिथ वेल्लालेगने 65 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. यात त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 103.08 इतका होता.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.