
टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने पुन्हा एकदा लय पकडलेली दिसते आहे. काही महिन्यांपूर्वी खराब फॉर्ममध्ये गेल्याने आणि नंतर टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्याने युझवेंद्र चहलच्या कारकिर्दीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात चहलने एक खास इतिहास रचला असून तो भारतातील सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात चहलने ही कामगिरी केली. भारताच्या अनुभवी फिरकीपटूने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शांकाची विकेट घेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकले.

चहलने केवळ 53 डावात 67 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या विकेट्स 25.31 च्या सरासरीने आणि 18.4 च्या स्ट्राईक रेटने घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बुमराहने 55 डावांत 66 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने या सामन्यातून पुनरागमन केले, मात्र 3 षटकांच्या स्पेलमध्ये त्याला कोणतेही यश मिळाले नाही.

या सामन्यात चहलने 3 षटकांच्या गोलंदाजीमध्ये केवळ 11 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. गेल्या काही सामन्यांमध्ये चहल सातत्याने विकेट घेत आहे. T20 विश्वचषकापासून सलग 9 एकदिवसीय आणि T20 सामन्यांमध्ये त्याने 11 विकेट घेतल्या आहेत.