
टीम इंडियाने मंगळवारी 14 ऑक्टोबरला दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सने मात केली. भारताने यासह ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. यानंतर हेड कोच गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. "कॅप्टन शुबमन गिल याला मेंटल कंडीशनिग कोचची गरज आहे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर गंभीरने काय उत्तर दिलं? जाणून घेऊयात. (Photo CrediT : PTI)

गंभीरने या प्रश्नाचं मस्करीत उत्तर दिलं. गंभीरच्या या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. "सर्वात आधी मला याची गरज आहे", असं गंभीरने म्हटलं. (Photo CrediT : PTI)

कोणत्याही स्थितीत मला टीममध्ये खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं आहे असं गंभीरने म्हटलं. "टीम जेव्हा जिंकत असते तेव्हा प्रत्येक खेळाडू हा चांगल्या स्थितीत असतो. मात्र जेव्हा विजय होत नाही तेव्हा खेळाडूंना चांगल्या माहोलमध्ये ठेवायचं आहे", असं गंभीरने नमूद केलं. (Photo CrediT : PTI)

टीम इंडियाने गंभीरच्या मार्गदर्शनात तब्बल 378 दिवसांनी कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने गंभीरच्या मार्गदर्शनात अखेरची कसोटी मालिका बांगलादेश विरुद्ध जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध (BGT) पराभूत व्हावं लागलं. तर टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 बरोबरीत सोडवली. (Photo CrediT : PTI)

दरम्यान आता टीम इंडिया गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 5 टी 20I सामने खेळणार आहे. (Photo CrediT : PTI)