
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत विजयाने सुरुवात केली. या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 101 धावांनी पराभूत केले. कटकमधील बाराबती स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने सामन्यावर पकड मिळवली. (Photo- BCCI Twitter)

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 175 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ फक्त 74 धावांपर्यंत मजल मारू शकला. यासह भारताने हा सामना 101 धावांनी जिंकला. (Photo- BCCI Twitter)

टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये तीन वेळा दक्षिण अफ्रिकेला 100 पेक्षा कमी धावात गुंडाळणारा संघ ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही संघाला दक्षिण अफ्रिकेला 100च्या आत गुंडाळणं शक्य झालेलं नाही. आता ही किमया भारताने करून दाखवली आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने 2022 मध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 87 धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर 2023 मध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण अफ्रिकेला 95 धावांवर रोखलं होतं. त्यानंतर आता 74 धावांवर गाशा गुंडाळण्यास भाग पाडलं. (Photo- BCCI Twitter)

भारताने दक्षिण अफ्रिकेला 74 धावांवर सर्व बाद केल्यानंतर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दक्षिण आफ्रिकेला तीन वेळा शंभरपेक्षा कमी धावांमध्ये गुंडाळणारा जगातील पहिला संघ बनला आहे. (Photo- BCCI Twitter)