IND vs NZ – देवदर्शनासाठी टीम इंडियाचे खेळाडू पोहोचले ‘या’ मंदिरात, ऋषभ पंतसाठी विशेष पार्थना

| Updated on: Jan 23, 2023 | 9:22 AM

टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळण्यासाठी इंदोर येथे दाखल झाली आहे. पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने सीरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

1 / 5
टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळण्यासाठी इंदोर येथे दाखल झाली आहे. पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने सीरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर शेवटचा वनडे सामना खेळला जाणार आहे. या मॅचआधी भारतीय टीम उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात पोहोचली.

2 / 5
भारताचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव, स्पिन बॉलर कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सोमवारी सकाळी महाकालेश्वराच दर्शन घेतलं. हे सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफ बाब महाकाल यांच्या भस्म आरतीमध्ये सहभागी झाले होते.

3 / 5
सर्व खेळाडूंनी विधीवत बाबा महाकाल यांची पूजा करुन आशिर्वाद घेतले. सर्व खेळाडू भगवान शंकराच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन ओम नमः शिवाय हा जप करताना दिसले. सूर्यकुमार यादवने खासदार अनिल फिरोजिया यांच्याकडून पूजा आणि सजावटीबद्दल माहिती जाणून घेतली.

4 / 5
दर्शन घेतल्यानंतर टीम इंडियाच सुपरस्टार सूर्यकुमार यादवने मीडियाशी चर्चा केली. "बाबा महाकाल यांच्या दिव्य अलौकिक भस्म आरतीमध्ये सहभागी होऊन धन्य झालोय" असं सूर्यकुमारने सांगितलं.

5 / 5
बाबा महाकालकडे मित्र ऋषभ पंतसाठी विशेष प्रार्थना केल्याच सूर्याने सांगितलं. "मी भरपूर साऱ्या गोष्टी मागितल्या आहेत. माझा प्रिय मित्र आणि क्रिकेटर ऋषभ पंतच्या प्रकृती स्वास्थासाठी मी विशेष प्रार्थना केली" असं सूर्या म्हणाला.